बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल,हा विजय सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा.ना. राधाकृष्ण विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

बैलगाडा शर्यतीचा लढा सर्वाच्या प्रयत्नामुळे जिंकता आला.- ना. राधाकृष्ण विखे पाटील.



शिर्डी, प्रतिनिधी. (18.मे.) : बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनापासून  स्वागत केले असून, हा विजय सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा आहे, १२ वर्षापासून सुरू असलेला लढा सर्वाच्या प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

न्यायालयाच्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यासाठी अनेक वर्षे लढा देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेल्या या लढ्याला न्याय मिळावा म्हणून केलेल्या सामुहीक प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे यावेळी  मंत्री विखे पाटील म्हणाले.

या स्पर्धाकरीता सरकारने यापुर्वीच केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला, याचे मोठे समाधान आजच्या निकालातून मिळाले असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील यांनी राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामवंत वकीलांची टिम उभी केली होती. बैलगाडा संघटनेसमवेत सातत्याने बैठका सुरू होत्या. सर्वाच्या सामुहीक प्रयत्नांचे यश आजच्या निकालात प्रतिबिंबिंत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात ग्रामीण भागात मोठी आत्मियता आहे. या स्पर्धेतून रोजगारही निर्माण होत असल्याने या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यास मिळालेला हिरवा कंदील मायबाप शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. खिल्लारी देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने आजचा निकाल पाठबळ देणारा ठरेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top