युनायटेड इंडिया इन्शु.कं.तर्फे जनजागृती रॅली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

विम्याचे संरक्षण काळाची गरज.- नगरसेवक बाळासाहेब बोराटे.

नगर, प्रतिनिधी. (28. मे.) : आझादीच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून युनायटेड इंडिया इन्शु. कंपनीने सामान्य नागरिकांपर्यंत विम्याचे महत्त्व पोहोचवण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 07:00 वाजता केले होते. या रॅलीचा शुभारंभ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र फुलसौंदर,अमर गुरप,विभागीय व्यवस्थापक युनायटेड इंडिया इन्शु.कंपनी, दत्तात्रय काटकर,किरण शिरसाठ,हिमांशू निमडे,मनप्रीतसिंग सच्चर,अभिषेक आगरकर,अभिजीत गुगळे,आणि युनायटेड इंडिया इन्शु.कंपनीचे सर्व ऑफिस स्टाफ,विमा प्रतिनिधी,सर्वेअर हे मोठया संख्येने उपस्थित होते.


माळीवाडा एसटी स्टँड जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली.रॅलीच्या पुढे लोकांना समजण्यासाठी ढोल ताशा वाजत आणि रिक्षावर विम्याच्या महत्त्वाचे जनजागृती बाबत लाऊड स्पीकरद्वारे माहिती सांगण्यात येत होती. सदरील रॅली सकाळी 07:30 वाजता माळीवाडा येथून सुरु होऊन साधारण 09:30 ला त्या रॅलीची समाप्ती महात्माफुले चौक येथे झाली.

रक्तदानाबरोबरच नेत्रदान आणि अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान.- नेत्रदूत जालिंदर बोरुडे. 

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय कार्यालयात सकाळी 11:00 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जनकल्याण रक्त पेढीचे डॉ. गुप्ता, अमर गुरप, शिवाजी मोरे, संजय मोरे आणि सर्व ऑफिस स्टाफ उपस्थित होते.

यावेळी अमर गुरप यांनी सांगितले की,आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने आपण समाजासाठी हे समाजकार्य केले पाहिजे.दत्तात्रय काटकर यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top