नगरमधील चहा शौकिनांसाठी कॅफे टी डे च्या दालनात 50 प्रकारच्या विविध फ्लेवर मध्ये चहा उपलब्ध. - REEL STAR. आदित्य सातपुते.
नगर, प्रतिनिधी. (29. मे.) : अहमदनगर शहरातील दिल्लीगेट या भागात कॅफे टी डे या दालनाचा शुभारंभ रील स्टार आदित्य सातपुते आणि ॲड.धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या दालनाचे उद्घाटन चंद्रकांत काळे आणि सुमन काळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी गुरु मीराताई,संजय सागावकर,प्रसाद तांदळे,रामप्रसाद काळे, ॲड.राहुल वरुडे,अजिनाथ ढाकणे यांच्यासह कॅफे टी डे ची संपूर्ण टीमसह नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी रील स्टार आदित्य सातपुते यांनी सांगितले की कॅफे टी डे या चहाच्या दालनात सुमारे 50 प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये नागरिकांसाठी चहा उपलब्ध करण्यात आले आहेत. या दालनात 10 रुपया पासून तर 40 रुपया पर्यंत विविध प्रकारचे चहा मिळतील.विशेष म्हणजे ज्या कपात चहा दिला जातो तो कप त्या ग्राहकाला चहा पिल्यावर खाता येतो. हा कप गहू आणि मैदा यापासून बनविलेला आहे.
तरी नगरमधील चहा शौकिनांसाठी काही वेगळे असे आम्ही आणले असून त्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन यावेळी कॅफे टी डे च्या टीमने केले आहे.