युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.आणि रोटरी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व विमा जनजागृती कार्यक्रम.

Ahmednagar Breaking News
0

युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.आणि रोटरी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व विमा जनजागृती कार्यक्रम.


नगर, प्रतिनिधी. (25. मे.) : आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था,राहुरी येथे रक्तदान शिबिर व विमा जनजागृती या कार्यक्रमाचे उद्घाटन  प्राचार्य मुकुंद महामुनी  यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अमर गुरप, विभागीय व्यवस्थापक,अहमदनगर व दीपक मानकर, सीनियर ब्रँच मॅनेजर,राहुरी हे होते. या कार्यक्रमासाठी रोटरी ब्लड सेंटर , राहुरी येथील कर्मचारी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,राहुरी येथील सर्व कर्मचारी,प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. रक्तदान केलेल्या नागरिकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच कार्यक्रमास वरिष्ठ पत्रकार सुनील भुजाडी हे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top