ॲड.महेश तवले यांची माऊली नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड.

Ahmednagar Breaking News
0

माऊली नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲडव्होकेट  महेश तवले.

नगर प्रतिनिधी. (06. मे.) : अहमदनगर शहरात गेल्या पंधरा वर्षापासून नावाजलेल्या माऊली नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नगर शहरातील ॲडव्होकेट महेश तवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ॲड.महेश तवले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी सुरेश लोळगे तर मानद सचिवपदी नितीन वाघ यांची निवड करण्यात आली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top