आरोग्य तपासणीतून ज्येष्ठांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न.- दिलीप चोरडिया.
नगर, प्रतिनिधी. (25. मे.) : विभक्त कुटूंब पद्धतीमुळे आज घरातील वृद्ध व्यक्ती अडचणी वाटू लागली आहे, त्यामुळे दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहेत. वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची संध्याकाळी ही सुखाने जात असली तरी ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे. वृद्धाश्रमाच्या माध्यमातून येथील वृद्धांना सर्वोतोपरि सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दैनंदिनी बरोबरच त्यांची नियमित आरोग्य तपासणी करुन त्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज फिनिक्स फौंडेशनचे जालिंदर बोरुडे व आनंदऋषीजी नेत्रलयाचे आनंद छाजेड हे आपले सामाजिक दायित्व जोपासत आमच्या मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन त्यांच्या जीवनात दृष्टी देण्याचे काम केले आहे.अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठांना आधार मिळाला तर आहेच पण त्याचबरोबर समाज आमच्याबरोबर आहे, ही भावनाही आनंदून गेली असल्याचे प्रतिपादन मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांनी केले.
विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे फिनिक्स फौंडेशन व आनंदऋषीजी नेत्रालयाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.चेतन तिवारी, फिनिक्सचे जालिंदर बोरुडे, डॉ.सौ.कमल गायकवाड, अनिल कोठारी, विनय छाजेड, व्यवस्थापक दिलीप चोरडिया आदि उपस्थित होते.
याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम केले जात आहे. समाजातील गोर-गरीबांचे दु:ख कमी करण्यासाठी त्यांना आवश्यक ती आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हजारोंना दृष्टी देण्याचे काम केले आहे ते यापुढेही असेच सुरु आहे. आज मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना दृष्टी मिळणार असल्याचे समाधान आहे, असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.चेतन तिवारी यांनी ज्येष्ठांची तपासणी करुन त्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची, ऑपरेशन झाल्यावर काय करावे, या विषयी मार्गदर्शन केले.या शिबीरात 48 ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यातील 13 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच 22 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.