यात्रेदरम्यान जेऊर बायजाबाई गावात झालेल्या दगडफेक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Ahmednagar Breaking News
0

यात्रेदरम्यान जेऊर बायजाबाई गावात झालेल्या दगडफेक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नगर,प्रतिनिधी.(08.मे) : नगर तालुक्यातील जेऊर बाईजाबाई गावात काल दि 07 मे रोजी यात्रेमध्ये यातील फिर्यादी पेट्रोलिंग करीत असताना सिनानदी पात्रात यात्रेच्या ठिकाणी मोठ्या पाळण्याजवळ जेऊरबायजाबाई येथील आरोपी पाळण्यामध्ये बसण्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करू लागले,त्यावेळी मुस्लिम मोहल्ल्यातील मुस्लिम मुलांनी दगडे उचलून इतर मुलांच्या पाठीमागे पळाले त्यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता ते मस्जीदकडे पळुन गेली,त्यानंतर मुस्लीम मोहल्यातील मुलांनी सिनानदी मध्ये थांबलेल्या इतर मुलांवर दगडफेक केली असता सिनानदी मधील मुलांनीही त्यांचेवर दगडफेक करुन यात्रेतील लोकांना व एकमेकांना जखमी करत असताना फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना मोठमोठ्याने ओरडुन सांगीतले की,तुम्ही दगडे फेकुन मारु नका,लोकांना दगड लागुन ते जखमी होत आहे.असे सांगत असताना त्यांनाही दगड मारुन धक्काबुक्की करुन फिर्यादी व साक्षीदार हे करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

पोना/दीपक ज्ञानदेव गांगर्डे नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून 1)इद्रीस मुनीर शेख 2)मन्नू अलीम कुरेशी 3)अजीज रफिक शेख 4 )हर्षद बागवान 5)साहिल बागवान 6)मुनीर खैरू शेख 7) शेख मुस्ताक 8)युनूस शेख 9)मुसा शेख 10)फइस रफिक शेख 11)अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले 12) सुनील दारकुंडे 13)गणेश दारकुंडे 14)दीपक शिंदे इतर शंभर ते 150 लोक सर्व राहणार जेऊर बायजाबाई यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न 396/2023 भादवि 353, 336,332,143,147,148,149,323,324 व क्रिमिनल ॲमेंडमेंट ऍक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय योगेश चाहेर हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top