जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सर्वसामान्यांसाठी द केरला स्टोरी चित्रपट करमुक्त व्हावा भाजप व अटल युथ फाउंडेशनची मागणी.

Ahmednagar Breaking News
0

जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सर्वसामान्यांसाठी द केरला स्टोरी चित्रपट करमुक्त व्हावा भाजप व अटल युथ फाउंडेशनची मागणी.

अहमदनगर,प्रतिनिधी. (11. मे.) : सर्वसामान्यांना द केरला स्टोरी चित्रपट पहाता यावे, या उद्देशाने हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी भाजपचे शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तथा अटलयुथ फाउंडेशनचे अध्यक्ष अमित गटणे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपचे शहर चिटणीस करण भळगट उपस्थित होते.  

देशात लव्ह जिहाद सारखा प्रश्‍न गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यासाठी वेळोवेळी राज्य व केंद्र स्तरावर सुध्दा लव्ह जिहाद सारखा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यातच नुकताच प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी चित्रपट लव्ह जिहादचे विदारक दृष्य जनतेसमोर दर्शवीत आहे. लव्ह जिहाद दोन धर्मामधील युद्ध नसून, राष्ट्रविरोधी कारस्थान असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

केरला स्टोरी लव्ह जिहाद व राष्ट्रविरोधी कारवाई बाबत जनजागृती करत आहे. त्यामुळे तो चित्रपट सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना पहाता यावा या उद्देशाने हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सदर मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देखील पाठविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top