09 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे अहमदनगर आकाशवाणीवर.

Ahmednagar Breaking News
0

09 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे अहमदनगर आकाशवाणीवर.

नगर,प्रतिनिधी.(07.जून.) : 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या अनुषंगाने अहमदनगर मधील फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या कार्याविषयी फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांची  मुलाखत शुक्रवार 09 जून रोजी सकाळी 08:40 मिनिटांनी अहमदनगर आकाशवाणीवर सादर होणार आहे. लोकजागर या सदराखाली ही मुलाखत होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी अहमदनगर 100.1 MHz आणि Newsonair या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही ऐकू शकता येईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top