विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने 300 युवक - युवतींना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने 300 युवक - युवतींना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

जामखेड,प्रतिनिधी. (02.जून.) : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक स्पर्धा परीक्षा घेण्यात येवून या परीक्षेतील ३०० गुणवंत विद्यार्थ्यांना MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांचे नामंकित संस्थे मार्फत मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी जाहीर केले. ते जामखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.रोहित पवार, कौशल्य विकास विभागाचे सह आयुक्त सूर्यवंशी, अजित यादव, शंकरराव बारवकर, प्रा.रेश्मा चेरे,दत्ताजी वारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी खा.विखे यांनी बोलताना सांगितले की दहावी आणि बारावी नंतर काय? हा सर्वांनाच पडणारा प्रश्न असून आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून आपल्या सुविधा आणि आपली सोय पाहून पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्या, अन्यथा मित्रांनी घेतले म्हणून कुठेही प्रवेश घेवून पैसा आणि वेळ वाया घालू नका. सध्या स्पर्धेचे युग असून आपण आपले सर्वोत्तम कशात देवू शकतो त्यातच करियर करा असा सल्ला देवून येत्या १५ जुन रोजी एक मोठी स्पर्धा परीक्षा घेणार असून यातून ३०० युवक युवती यांची MPSC व UPSC च्या मुख्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे या प्रसंगी त्यांनी आवाहन केले. राजकारणात सध्या अत्यंत वाईट दिवस असून उच्चशिक्षित तरुणांचे हे क्षेत्र नाही इथे अशिक्षित नेते तुम्हालाच चार गोष्टी सूनवतात त्यामुळे या दललित येवू नका असे आवर्जून सांगितले. योगायोगाने जरी विविध पक्षाचे नेते एकमेकांना भेटले तरी त्याच्या पत्रकार आपल्या सोयीने बातम्या करतात ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.गरीब विद्या्थ्यांसाठी समविचारी लोकप्रतनिधींच्या सहकार्यातून कशा पद्धतीने शिक्षण देता येईल या करिता आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या शिबिरात आ.रोहीत पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या युवाशक्ती शिबिरात प्रशिक्षणार्थी यांना करियर मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने विविध विभागातील व्यवसाय संधी तसेच नौकरी याबाबत तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.शिबिरास प्रशिक्षनर्थीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top