केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महेश जंजिरे देशात 92 वा.

Ahmednagar Breaking News
0

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महेश जंजिरे देशात 92 वा.

केंद्रीय पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी निवड.

नगर, प्रतिनिधी. (03. जून.) : यूपीएससी,यूपीएससी CAPF, MPSC,एम ई एस,बी आय एस, नाबार्ड,सेबी आणि इतर अनेक 40 पेक्षा जास्त मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार यूपीएससी मुलाखती,चार शारीरिक परीक्षा (PST /PET),सात वैद्यकीय परीक्षा (3 RME ),तीन वेळा मेरिटमध्ये,तीन वेळा वैद्यकीय मेरिटमध्ये.

अखेर यूपीएससीच्या ए आय आर 92 चे अधिकृत सहाय्यक कमांडंट ( असिस्टंट कमिशनर / सहाय्यक पोलीस आयुक्त ) यात समावेश झाला.

महेश ईश्वर जंजिरे याचे प्राथमिक शिक्षण श्रीगोंदा येथील सुनंदा होनराव प्राथमिक विद्यालयात, माध्यमिक शिक्षण प्रवरानगर येथील विखे पाटील सैनिक स्कूलमध्ये झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण रेसिडेन्सीअल हायस्कूलमध्ये झाले आहे. त्याने पुणे येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिलची पदवी घेतली आहे. महेश हा शासकीय ठेकेदार ईश्वर जंजिरे यांचा मुलगा असून आई हि गृहिणी आहे.तर बहिण निकिता एमपीएससीची तयारी करत आहे.

यावेळी ए बी एन शी बोलताना महेश जंजिरे याने सर्वांचे आभार मानले. जो कठीण काळात माझ्या पाठीशी उभा राहिला, हे माझे यश नाही तर तुमच्या पाठिंबामुळे आणि प्रेरणेमुळे माझ्या स्वप्नांचा मार्ग मोकळा झाला.मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यात आहात अशी प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top