दुष्काळाचे सावट दूर होहु दे हिच प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करावी.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी. (18. जून.) : पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वारकऱ्यांनी दुष्काळाचे सावट दूर करण्याचे साकडे घालावे अशी विनंती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली. आज सकाळी विळद घाटातील डॉ.विखे पाटील मेडिकल फाउंडेशनच्या वतीने योगीराज गंगागिरी महाराज संस्थान सरालाबेट ता. श्रीरामपूर येथील पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी फाउंडेशनचे अधिष्ठाता डॉ.अभिजित दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संस्थांचे मठाधिपती महंत नारायणगिरी महाराज यांचे खा.विखे यांनी मनोभावे स्वागत केले. याप्रसंगी वारकऱ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले की विखे पाटील घराण्यांच्या वतीने गेल्या वर्षानुवर्षांची ही परंपरा असून याही वर्षी योगीराज गंगागिरी महाराज संस्थान सरालाबेट ता.श्रीरामपूर येथील पालखीचे स्वागत हे घाटात आम्ही केले. महाराजांच्या आशीर्वादाने यावर्षी थेट पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य विखे पाटील कुटुंबाला लाभले आहे.
महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील हे सोलापूरचे ही पालकमंत्री असून नगर जिल्हा पासून सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणाहून वारकरी हे पंढरपुरात येतात त्या त्या मार्गावर सर्व सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यावर्षी उशिरा पावसाचे आगमन होत असून दुष्काळी सावट दूर करण्यासाठी विठ्ठुरायकडे हे संकट दूर करण्याचे साकडे घालावे अशी विनंती त्यांनी केली.वारीच्या निमित्ताने आपणांस प्रवासात कुठलाही त्रास होणार नाही यादृष्टीने शासनाने सर्वोतोपरी सोय केली असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले तर आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण घेणारे डॉक्टर्स, कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.