साई द्वारका सेवा ट्रस्ट व गोरे डेंटल क्लिनिक, तोफखाना यांच्या संयुक्त विद्यमाने
ॲड.धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन.
नगर,प्रतिनिधी.(10.जून.) : माजी.नगरसेवक ॲड.धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साई द्वारका सेवा ट्रस्ट व गोरे डेंटल क्लिनिक,तोफखाना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत गोरे डेंटल क्लिनिक, नवरंग व्यायाम शाळे शेजारी,तोफखाना येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात कृत्रिम फिक्स दात बसवणे,एका दिवसात रूट कॅनल व कॅप, वेडे वाकडे दात सरळ करणे,लहान मुलांचे एका दिवसात रूट कॅनल, तसेच व्यसनांमुळे कमी उघडणाऱ्या तोंडावर उपचार, दातात सिमेंट,चांदी भरणे यासारख्या उपचारांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे दंत व्यंगरोपचार तज्ञ डॉ केतन गोरे व डॉ अंजली गोरे यांनी सांगितले. तसेच यावेळी ज्या पेशंटला औषधांची गरज आहे त्याचे वाटप करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी 9561645555 या नंबर वर संपर्क साधावा.
बालकांसाठी भव्य बाल मेळावा.
तसेच सायंकाळी 6:30 वाजता लहान मुलांसाठी भव्य बाल मेळाव्याचे आयोजन सिद्धीबाग,अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.यात लहान मुलांसाठी रेल्वे सफर,जम्पिंग - जंप, मिकी माऊस,घोडेसवारी,पाळणा,भव्य मासा घर आणि इतर बरेच काही आकर्षण खेळ आणि खाण्यासाठी भेळ,पाणीपुरी, रगडापुरी,कच्ची दाबेली,चॉकलेट,पॉपकॉर्न आणि इतर बरेच काही मोफत ठेवण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा आणि आपल्या बालकांसाठी बाल मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन साई द्वारकासेवा ट्रस्ट व ॲड.धनंजय जाधव मित्र मंडळ,तोफखाना यांच्या वतीने करण्यात आले आहे.