विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय,पुणे येथे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांची बैठक.
नाशिक, प्रतिनिधी. (18. जून.) : नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी अहमदनगरच्या मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षण उपसंचालक (पुणे), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अहमदनगर,वेतन विभाग अधिक्षक (माध्यमिक) व लेखाधिकारी यांच्यासोबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे सोमवार दि.26 जून 2023 रोजी दुपारी.12.00 वा. बैठक आयोजित केली आहे.
तसेच या बैठकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थितीत राहाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.