योग विद्या धाम व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त योग दिंडीचे आयोजन.
नगर,प्रतिनिधी.(20.जून.) : योग विद्या धाम व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त नगर शहरात विविध ठिकाणी योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. योग विद्या धाम,अहमदनगर ही संस्था गेली 38 वर्षांपासून योगाचे कार्य करत आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगाचे महत्त्व समाजाला समजावे व समाजात योगाची जनजागृती,योगाचा प्रसार व प्रचार खूप जोमाने व्हावा यासाठी योग विद्याधाम व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरात विविध ठिकाणी योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दि.17 जून ते दि.19 जून या तीनही दिवशी योग दिंडी काढून सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक ते सावली सोसायटी, श्रीराम चौक ते भिस्तबाग चौक या मार्गाने दिंडी काढून साधकांनी (योग) ठीक ठिकाणी योगाचे प्रात्यक्षिके दाखविली. योग गीते गायली, घोषवाक्य म्हटली. अशा प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न करून लोकांमध्ये योगाचे महत्त्व पटवून दिले. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसादही दिला.
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी 21 जून हा जागतिक योग दिन पाळावा असे सांगून त्यांनी ही बहुमोल कामगिरी समाजासाठी करून योगाला एक उत्तुंग स्थान निर्माण करून दिले.