शेतकऱ्यांसाठी तीन दिवस वाढीव आवर्तन.

Ahmednagar Breaking News
0

शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामा करिता 3 दिवस वाढीव आवर्तन.- खा.डॉ. सुजय विखे पाटील.

नगर,प्रतिनिधी.(22. जून.) : कुकडी डाव्‍या कालव्‍यातून उन्‍हाळी हंगामाकरीता सुरु असलेल्‍या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्‍यातील शेतक-यांची पाण्‍याची गरज लक्षात घेवून 3 दिवस वाढविण्‍यात आली असून विसापूरलाही पाणी वळविण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

या संदर्भात खासदार डॉ.सुजय विखे पाटील व माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी पुणे जिल्‍ह्याचे पालकंमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍याशी संपर्क साधून या आवर्तनाचा कालावधी वाढवावा अशी विनंती करुन मागणी केली होती. याबाबत कुकडी कालवा सल्‍लागार समितीमध्‍ये 6 दिवसांचे आवर्तन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता.परंतू श्रीगोंदा तालुक्‍यात शेतक-यांना असलेली पाण्‍याची गरज लक्षात घेता या कमी कालावधीच्‍या आवर्तनामुळे पुर्ण सिंचन होणे शक्‍य नव्‍हते ही बाब मंत्री ना.चंद्रकांत पाटील तसेच नगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या निदर्शनास आणून देण्‍यात आली होती.आवर्तनाचा कालावधी आता 9 दिवसांचा झाल्‍यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यांना मिळालच पण यापेक्षाही महत्‍वाचे म्‍हणजे श्रीगोंदा तालुक्‍यातील विसापूरलाही पाणी वळविण्‍याच्‍या सुचना आधिका-यांना देण्‍यात आल्‍या असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आ.बबनराव पाचपुते यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top