नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम आमदार संग्राम जगताप करत आहे. - अभिजीत खोसे.

Ahmednagar Breaking News
0

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून केडगाव औद्योगिक वसाहतीतील ड्रेनेज लाईनचा प्रश्न अखेर लागला मार्गी. 

नगर, प्रतिनिधी. (23. जून.) : केडगाव औद्योगिक वसाहत, अयोध्या नगर, जे एल पी कॉलनी तसेच लिंक रोड परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षाचा ड्रेनेज लाईनचाप्रश्न प्रलंबित होता. नागरी वसाहती झपाट्याने वाढत चालल्यामुळे ड्रेनेज लाईन मधून मैल मिश्रित पाणी औद्योगिक वसाहती मधील रस्त्यावर तसेच पुणे महामार्गावर अक्षरशः वाहत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. त्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पुणे महामार्गावरून प्रवासी जात असताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष घालून ड्रेनेज लाईनचा प्रश्न तातडीने मार्गी लावला आहे. त्यामुळे सर्वत्र सासलेले मैलमिश्रित पाणी वाहूनजात आहे. या भागातील नागरिक व औद्योगिक वसाहतीतील उद्योजक अक्षरशा ड्रेनेज लाईन च्या समस्येमुळे वैतागले होते. हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम आमदार संग्राम जगताप करत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी केले.  केडगाव औद्योगिक वसाहत आयोध्या, नगर जे एल पी कॉलनीतील ड्रेनेज लाईन कामाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, उद्योजक अरविंद गुंदेचा, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, एडवोकेट युवराज शिंदे, निलेश बांगरे, नामदेव भोसले यांनी केली

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top