लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. - नगरसेवक रामदास आंधळे.
नगर प्रतिनिधी. (03. जून.) : आज लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना नगरसेवक रामदास आंधळे.यावेळी अशोक गायकवाड,अभय खाबिया,शिरीष जानवे,बंटी डापसे,प्रदीप घोडके,विशाल साबळे, जितेंद्र डापसे,पत्रकार अशोक झोटिंग यांसह मुंडे साहेब प्रेमी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक रामदास आंधळे यांनी सांगितले की, मुंडे साहेबांनी दिलेला वारसा आम्ही आणि मुंडे प्रेमी विकासातून पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करत आहे. साहेब ज्याप्रमाणे गोरगरीब आणि गरजू जनतेला मदत करीत असे त्याच प्रमाणे आम्ही देखील कायमच जनतेच्या कामास कटिबद्ध आहोत.