वेदांत नगर मधील भगवान श्री दत्तात्रेय मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Ahmednagar Breaking News
0

वेदांत नगर मधील भगवान श्री.दत्तात्रेय मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

नगर,प्रतिनिधी.(15.जून.) : वेदांत नगर, प्रेमदान चौक, सावेडी,अहमदनगर येथील प.पु सद्गुरू श्री.रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या आशीर्वादाने भगवान श्री.दत्तात्रेय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा दिन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळपासूनच मंदिरात भगवान श्री.दत्तात्रेय मूर्तीवर पहाटे 111 लिटर दुधाचा पवमान अभिषेक व गायन सेवा करण्यात आली. सकाळी 7:00 वाजता कार्यक्रमास सुरवात झाली.गणपती पूजन करून शतकलश स्थापन व पूजन करण्यात आले,त्यानंतर चतुर्वेद मंत्राने कलश अभिमत्रण करून 10:30 वाजता अभिषेक प्रारंभ झाला.विविध नद्यांचे पाणी, विविध वनस्पतींचे पाणी, आंब्याचे रस, उसाचा सर, पंचगव्य, पंचामृत,गंध,हळद इत्यादी नानाविविध द्रव्यांनी अभिषेक केला. हा अभिषेक देवस्थानचे आर्चक वेदमूर्ती राजाराम धर्माधिकारी गुरुजी, व वेदमूर्ती विष्णुदास टेंगसे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला.श्री.दत्त देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त पुरुषोत्तम कुलकर्णी हे यजमान होते.

यानिमिताने दिनांक 9 जून पासून सुरु झालेल्या विष्णू सुदर्शन यागाची सांगता दिनांक 14 जून ला करण्यात आली.या यागाचे पौरोहित्य वेदमूर्ती विष्णुदास टेंगसे यांनी केले. वेदांतविद्यापीठातील अध्यापक व विद्यार्थ्यांनी चतुर्वेद मंत्र सेवा करून नेवेद्य व महाआरती संपन्न झाली.यावेळी भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती, त्यानंतर भक्तांना प्रसाद देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top