अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी गिरीश रासकर.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनची स्थापना, अध्यक्षपदी गिरीश रासकर, सचिवपदी श्रीकांत नवले.

नगर, प्रतिनिधी. (27. जून.) : अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनची स्थापना झाली असून संस्थेची नोंदणीही धर्मादाय आयुक्त कार्यालयात झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी गिरीश रासकर तर सचिवपदी श्रीकांत नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वृत्तपत्र वितरण अधिकारी व प्रतिनिधी यांची बैठक होऊन वृत्तपत्रातील वितरण विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधींच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यात आली. यावेळी संघटनेचे ध्येय धोरणे, संस्थेची आगामी वर्षातील वाटचाल कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आदींबाबत चर्चा होऊन संघटनेच्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी गिरीश रासकर निवड करण्यात आली. रासकर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात उपाध्यक्ष - संतोष बडवे, सुधीर लोळगे, सचिव - श्रीकांत नवले, खजिनदार - कांतीलाल पुरोहित, सहसचिव - योगेश सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख - राजेश गागरे, मुख्य सल्लागार - देविदास वैद्य, कार्यकारिणी सदस्य - प्रमोद गायकवाड, राजेंद्र पालवे, नरेश रासकर, अशोक बेरड, देविदास आंधळे, गणेश उनवणे, महेश खेंडके आदींची निवड करण्यात आली.गिरीश रासकर म्हणाले की, सबंध देशात वृत्तपत्र वितरण विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधींची ही पहिलीच संघटना असून भविष्यात संघटनेच्या माध्यमातून वितरण विभागातील अधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह वृत्तपत्र विक्रेत्यांच्या तसेच वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांच्याच सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे. वितरण विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी दिवस - रात्र वृत्तपत्र संस्थेच्या प्रगतीकामी झटत असतात. यावेळी त्यांच्याकडून नकळतपणे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वेळीच उपचार, आरोग्याबाबत सल्ला न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यासाठीच वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण शिबिरे, मानसिक आरोग्यासाठीची प्रशिक्षणे, विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमे राबविणार आहोत, असे रासकर यांनी आश्वासित केले.संतोष बडवे म्हणाले की, अनेक वर्षांपासून वितरण विभागाच्या सर्व प्रतिनिधींची एक सामाजिक संघटना असावी अशी अपेक्षा होती आज ती पूर्ण झाली. संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वितरण विभागासह वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला विविध स्तरावर सहयोग देण्याचे काम करणार आहे, असे बडवे यांनी सांगितले.यावेळी महेश खेंडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले देविदास आंधळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top