वेदांती इंगळे हिची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

Ahmednagar Breaking News
0

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी  न्यू आर्टस महाविद्यालयाची वेदांती इंगळे हिची निवड.


अहमदनगर,प्रतिनिधी. (04. जून.) : नवी दिल्ली येथे होणाऱ्या सन २०२२-२३ च्या ६६व्या राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी जिल्हा मराठाविद्या प्रसारक समाजाच्या न्यु आर्टस कॉमर्स अँड सायन्स कॉलेज महाविद्यालयाची इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची वेदांती मच्छिंद्र इंगळे हिची निवड झाली आहे. हि स्पर्धा  नवी दिल्ली येथे ६ जुन २०२३ ते ११ जुन २०२३ या दरम्यान होत आहे. वेदांतीच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील,उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे यांनी तिचे विशेष कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र चेस असोशिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व अहमदनगर चेस असोशिएशनचे सचिव यशवंत बापट यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वेदांती हिस जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले व नगरच्या क्रिडा अधिकारी दिपाली बोडखे यांचे तिला मोलाचे सहकार्य लाभत आहे. तिच्या या यशात तीला  प्रशिक्षण देणारे प्रकाश गुजराती व विशाल गुजराती यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top