नगरच्या सायकल स्वारांची एका दिवसात सायकलवर पंढरपुर वारी..!!
नगर, प्रतिनिधी. (26. जून.) : सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या सायकल वारीत नगरचे सायकक्लीस्ट सामील झाले होते. सर्वांनी एकाच दिवसात सायकलवर पंढरपूरवारी पूर्ण केली.सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी आषाढी एकादशी निमित्त अहमदनगरच्या सायकलिस्टनी सायकलवर पंढरपुर वारी पूर्ण केली. पंढरपूर सायकल वारीचे हे चौथे वर्ष होते.पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी वारकरी जात असतात. सगळ्यांनाच पायी जाणे शक्य होत नाही.आजकालची तरुण पिढी सायकलकडे आकर्षित झाली आहे. सायकलची गोडी निर्माण झाल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास सायकलवर करण्यामध्ये सायकल स्वाराला आनंद असतो.शनिवार दिनांक २४ जून २०२3 रोजी सकाळी ५ वाजता विशाल गणपतीचे दर्शन घेऊन वारीला सुरवात झाली. रायकर साहेब यांनी मांदळी येथे त्यांच्या निवास्थानी नाश्त्याची व्यवस्था केली.माढ्याचे आमदार श्री संजू मामा शिंदे यांनी जेवणाची व्यवस्था केली. करमाळा ते टेंभुर्णी यादरम्यान अनेक दिंड्या भेटल्या. सायकल स्वार काही काळ त्या दिंड्यांमध्ये चालले व नाचले सुद्धा. अहमदनगर येथून सकाळी निघून करमाळा टेंभुर्णी मार्गे सर्वजण पंढरपूरला संध्याकाळी पोहोचले. दत्त देवस्थान देवगड येथे फ्रेश होऊन पांडुरंगाचे दर्शन घेतलं. रात्रीच परतीचा प्रवास करून सर्वजण पहाटेच नगरला सुखरूप पोहोचले.सर्व सायकलस्वार 24 तासाच्या आत अहमदनगरला पोहोचले. यात सुधाकर लोंढे (नारायणगाव), रवींद्र जाधव (राहुरी), सिद्धार्थ दरंदले(सोनई),मंडलिक, डॉ. राजगुडे ,शरद डोंगरे व शरद काळे पाटील आदींनी सहभाग घेतला.
ही यात्रा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगरच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले आहेत.