पंजाब अँड सिंध बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.
नगर,प्रतिनिधी.(23. जून.) : पंजाब अँड सिंध बँकेच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार,24 जून रोजी अहमदनगर मधील पारिजात चौक, गुलमोहर रोड शाखेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,असे शाखाधिकारी जितेंद्र पटल्या यांनी सांगितले.विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन सकाळी 9:00 वाजता होणार असून हे शिबीर दुपारी 12:00.वाजेपर्यंत असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घेऊन आणि उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.पंजाब अँड सिंध बँक अहमदनगर शाखेला मोठं करण्यात आणि पुढे नेण्यात ग्राहकांनी मोलाचा वाटा उचललाय असे बँकेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेने ग्राहकांसाठी "व्हाट्सअप बँकिंग."ही एक विशेष सुविधा सुरू केली आहे.तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी बँकेच्या वतीने करण्यात आले.