वारकऱ्यां सोबत खासदार सुजय विखे पाटील यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा- माऊली- तुकाराम असा ठेका धरला.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर जिल्ह्यातील दिड्यांसह खा.डॉ.सुजय विखे पाटील आषाढीसाठी पंढरपुरात दाखल.

पंढरपूर,प्रतिनिधी. (28. जून.) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 237 दिंड्या बुधवारी पंढरपुरात पोहचल्या. या दिंड्यासह अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील हेही पंढरपुरात पोहचले. पंढरपुरात पोहचताच वारकर्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. वारी दरम्यान कोणाला काही त्रास , काही अडचण आली का याची ही त्यांनी विचारपूस केली. जिल्ह्यातील पाथर्डी, सुप्पा,शेवगाव, श्रीरामपूर, जामखेड, राहता,यासह इतर तालुक्यातून आलेल्या दिंड्यांचे दर्शन घेवून त्यांनी वारकर्या सोबत टाळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा- माऊली- तुकाराम असा ठेका धरला. काही दिंड्यातील महिला वारकऱ्या समवेत शिदोरी ही खाल्ली तर काही दिंडीतील महिलांच्या आरोग्याची विचारपूस यावेळी केली. विठ्ठू माऊलीच्या नाम गजरात या दिंड्यासह त्यांनी पंढरपुरात आगमन केले. आपला खासदार आपल्या दिंडिसह चालतोय हा ही अनुभव वारकऱ्यांनी या वारीत अनुभवला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top