कोतवाली पोलिसांकडून अहमदनगर शहरात मोटरसायकल चोरी करणारा आणखी एक सराईत चोरटा जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

कोतवाली, तोफखाना व इतर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी केलेल्या १,८५,०००/- रू किंमतीच्या ४ मोटारसायकल व एक रिक्षा जप्त.

नगर, प्रतिनिधी. (18. जून.) : अहमदनगर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सो, यांनी विशेष पथक स्थापन करुन अहमदनगर शहरातील मोटार सायकल चोरी करणारे इसमांचा शोध घेणेबाबत आदेश दिल्याने विशेष पथकातील पोसई मनोज कचरे, पोना/ शाहीद शेख, पोकों/ प्रमोद लहारे, पोकों/सुमित गवळी, पोकों/दिपक रोहकले, पोकों/सोमनाथ केकान, पोकॉ/ अशोक कांबळे अशांनी गुप्त बातमी काढून अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्टॅन्ड अहमदनगर परीसरात मोटार सायकल व रिक्षा चोरी करणारा इसम सुरज ऊर्फ सोनु शिवाजी शिंदे हा अॅटो रिक्षासह मिळून आल्याने त्याने रिक्षा विषयी चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यास विश्वासात घेवून रिक्षा विषयी अधिक विचारपुस केली असता त्याने ती रिक्षा चिखली पोलीस स्टेशन हद्दीत चोरून आणल्याची कबुली दिल्याने त्याने अहमदनगर शहरात व परीसरात आणखी मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला कोतवाली पोलीस स्टेशन, गुरनं ६०३१/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या एक रिक्षा व ४ मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे- 

१) १,००,०००/- रु किची काळे पिवळया रंगाची बजाज ऑटो रिक्षा तिचा पुढील व पाठीमागील बाजूस नंबर नाही असा असलेली जुवाकिअ

२) २००००/- रु किची एक चॉकलेटी रंगाची अॅव्हेटर मोटार सायकल तिचा चेसी नं ME४JF २१५JE८१८३२४३ इंजिन नंबर JFRE८०२१७७४० असा असलेली जुवाकिअं. तीचा चेसी नं.MD२B४७AX५NWK१२२४६ त्यांचा इंजीन नं. AZXWNK२४११८ असा 

३) २००००/- रु किची एक सिल्व्हर कलरची अॅव्हेटर मोटार सायकल तिचा चेसी नंबर ME४JF२१९AH८१२३७७१ इंजिन नंबर JF२१E८११८१२४२ असा असलेली जुवाकिअं.

४) २५०००/- रु किं ची होन्डा कंपनीची काळया रंगाची तिच्या वर सिल्व्हर रंगाचा पट्टा असलेली म सा तिचा चेसी न MBLHAW१२XM५J१८३०९ इंजिन नंबर HA११EYM५५९५७२ असा असलेली जुवाकिअं 

५) २०,०००/- रु किंची एक का ळया रंगाची होन्डा कंपनीची शाईन तिचा चेसी नंबर ME४JC६५ AJJ७१८१३७७ इंजिन नंबर JC६५E७२२८२८०३ असा असलेली जुवाकिअं.

अटक आरोपीवर यापूर्वीचे मोटरसायकल व इतर चोरीचे कोतवाली तसेच तोफखाना पोलीस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोना/ १४२९ शाहीद शेख, पोका १५७२ प्रमोद लहारे, पोको / १७९६ सुमित गवळी, पोकों/ १९१९ दिपक रोहकले, पोकों/ १०१ सोमनाथ केकान, पोका/अशोक कांबळे, तसेच सायबर सेलचे पोकों/नितीन शिंदे यांनी सदरची कारवाई केली असून सदर गुन्हयाचा तपास पोहेका/इखे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top