शासन आपल्या दारी अभियान जनतेच्या हिताचे. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

शासन आपल्या दारी अभियान जनतेच्या हिताचे. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

जामखेड,प्रतिनिधी.(02. जून.) : राज्यात शिंदे - फडणवीस यांचे सरकार आल्यावर सर्वसामान्यांना केंद्र मानून मोठ्या प्रमाणावर विविध अभियान राबविण्यात येत आहेत. याचा लाभ गोरगरीब, गरजू यांना वेळेत आणि कुठलेही अतिरिक्त खर्च न करता कागदपत्रे, दाखले मिळण्यासाठी नक्की होणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.जामखेड येथे शासन आपल्या दारी या अभियानास भेट दिल्यावर ते उपस्थित लाभार्थ्यांना बोलत होते. 

हे अभियान एक जुन ते तीन जुन पर्यंत जामखेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात दोन दिवसात विभक्त रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत कार्ड, कृषी विभागाचे विविध दाखले, इतर महत्वाचे दाखले, कागदपत्रे घेण्यासाठी लागणारे अत्यावशक कागदपत्रे दिल्यास कुठलाही अतिरिक्त खर्च न करता घरपोच हे दाखले, कागदपत्रे मिळतील. आधीच्या सरकार मध्ये सर्वसामान्यांची शासाना कडून लूट होत होती. ही लूट आपलं सरकार आले की थांबविली असून फक्त अत्यावश्यक कागदपत्रे दिली की तुम्हाला तुमचे महत्वाचे कागदपत्रे मिळतील असा विश्वास खा. विखे यांनी यावेळी उपस्थितांना दिला.दरम्यान या अभियानात कृषी, महसूल, जिल्हापरिषद, पंचायत समिती यासह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.दोन दिवसात नागरिकांनी या अभियानास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top