नगरच्या गायिका अपूर्वा निषाद आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात " माझा विठूराया "हे भक्तीगीत प्रसारित.

Ahmednagar Breaking News
0

नगरच्या गायिका अपूर्वा निषाद आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात " माझा विठूराया "हे भक्तीगीत प्रसारित.

नगर, प्रतिनिधी. (28. जून.) : आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी असंख्य अगणित पायी विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे.माझी विठू माऊली,विठू माझा माय बाप, पासून तर जनाबाईंच्या शब्दात येणाऱ्या अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या पर्यंत विठ्ठलाबद्दलची आत्मियता अशा अनेक गीतातून रसिकांच्या भेटीला आलेली आहे.यावर्षीचं अत्यंत लोकप्रिय ठरलेलं भक्ती गीत, "माझा विठूराया " आहे .या गीतात विठ्ठल भेटीची आस, विठ्ठलाला आर्तेतनं मारलेली हाक आहे .आपल्या अहिल्या नगरची गायिका अपूर्वा निषाद आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी हे गीत गायले आहे. "माझा विठुराया" या भक्ती गीताला संगीत पद्मनाभ गायकवाड यांनी दिले असून टाईम्स म्युझिकच्या स्प्रिच्युअल या प्रसिद्ध माध्यमाद्वारे प्रसारीत केलेलं हे गाणं यंदाच्या वारकरी संप्रदायाचा अनमोल ठेवा ठरले आहे .माझा विठूराया या बहुचर्चित  गाण्याचा प्रेक्षकांनी रसिकांनी आस्वाद घेऊन आषाढी एकादशी साजरी करावी अशी अपेक्षा संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि दिग्दर्शक प्रशांत पांडेकर यांनी केली आहे.तर गायिका अपूर्वा निषाद हिने रसिकांनी या भक्ती गीताला आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top