बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुलमध्ये आषाढी एकादशी साजरी.

Ahmednagar Breaking News
0

बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुलमध्ये आषाढी एकादशी साजरी.

नगर, प्रतिनिधी.(29. जून.) : बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल च्या विद्याथ्र्‍यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात बोल्हेगाव उपनगरातून दिंडी काढून स्वछतेचा संदेश दिला. ही दिंडी विविध भागातून मार्गक्रमण करताना दिंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा  मी विठ्ठलाचा…, या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल नामाच्या जय घोषात, टाळ- मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली होती. दिंडीत विद्यार्थी वारकरींच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुलस घेऊन सहभागी झाल्या होत्या.भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व वीणा हातात घेऊन बाल वारकर्‍यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करुन या सोहळ्याला प्रारंभ झाले. यावेळी सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर , उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले,  कोषध्यक्ष संदीप गांगर्ड, मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद आदी उवस्थित होते.  परिसरातील विठ्ठल  मंदिर समोर विद्याथ्र्‍यांनी केलेल्या रिंगण सोहळ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले.  गांधी चौक येथून मार्गक्रमण करत गणेश नगर, बोल्हेगाव असे फिरून शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप करण्यात आला. या वेळी विदयार्थ्यांची दिंडी पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top