केडगाव चौफुला उड्डाणपुलाचे लोकार्पण खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न.
अहमदनगर,प्रतिनिधी.(23. जून.) : विळद ते वाळुंज बायपास वरील केडगाव चौफुला येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व जिल्हाबँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.गेल्या वर्षभरा पासून केडगाव चौफुला बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाण पूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. हे काम पूर्ण झाले त्याची विविध पातळीवर चाचणी देखील संबंधित यंत्रणेने केली त्या नंतर आज या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले.केडगाव परिसरातील मोठ्या प्रमाणावर वाढलेले वाहतुकीस याचा फायदा होणार असून थेट उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्याने या भागात आता वाहतुकीची समस्या ही कमी होणार आहे. यावेळी सचिन कोतकर मनोज कोतकर,पोपट कराळे,राहुल कांबळे, विरेन कुमार तसेच ग्रामस्थ, महामार्ग चे प्रमुख अधिकारी कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.