पारिजात चौकातील पत्र्यांच्या दुकानांना भीषण आग.

Ahmednagar Breaking News
0

पारिजात चौकातील पत्र्यांच्या दुकानांना भीषण आग.

नगर,प्रतिनिधी(16.जून) : सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकातील पत्र्यांच्या दुकानांना आज शुक्रवारी दुपारी 1:30 ते 2:00 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले.अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नगरसेवक व पोलीस मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.या आगीत तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले.यात भंगार,कुशन व फर्निचर दुकानांचा समावेश आहे. आगेचे नेमके कारण समजू शकले नाही.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top