🟠श्रीगुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम.🟠
नगर, प्रतिनिधी. (02. जुलै.) : सर्व सत्संग मंडळांना व भक्तांना सूचित करण्यात येते की, श्रीगुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी संपन्न होणार आहे.उत्सवाची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे.
🟠 भगवान श्रीदत्तात्रेयांचे दर्शन सकाळी 7.00 ते दुपारी 12.30 व दुपारी 1.00 ते रात्री 9.00
🟠 श्रीदत्तात्रेय निवास दर्शन- सकाळी 7.00 ते दुपारी 12.30 व दुपारी 1.00 ते रात्री 9.00
🟠 श्रीमन् नृसिंह सरस्वती तपोवन - सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00
🟠 प. पू. श्रीसद्गुगुरूंचे दर्शन - सकाळी 7.00 ते 11.30, दुपारी 1.00 ते 3.30, संध्या. 5.30 ते 6 व सायं.आरतीनंतर रात्री 9 पर्यंत.
🟠 दुपारी 12.00 वाजता आरती होईल व आरतीनंतर भक्तांना श्रीदत्तक्षेत्री प्रसादभोजनाचा लाभ मिळेल.
🟠 दुपारी 4.00 ते 5.30 पाद्यपूजा.सर्व सत्संग मंडळांतर्फे श्रीगुरुपादुकांची पाद्यपूजा अधिष्ठान मंडपात संपन्न होईल. पाद्यपूजेसाठी प्रत्येक सत्संग मंडळाचे फक्त चारच पदाधिकारी हजर राहतील.
🟠सायंकाळी 7.00 वाजता आरती.
दिनांक 2 जुलै 2023 रोजी निवासी येणाऱ्या भक्तांसाठी रात्री 9.30 वाजेपर्यंत प्रसाद भोजन उपलब्ध असेल.तसेच दिनांक 3 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत नाश्ता उपलब्ध असेल.तरी भक्तांनी वरील कार्यक्रमानुसार श्रीगुरुपौर्णिमा उत्सवात दर्शनाचा लाभ घ्यावा.