देशातील जनतेच्या मनात पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्याचा निर्धार कायम.- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
राहुरी,प्रतिनिधी.(12. जुलै.) : आघाड्याचे राजकारण फारकाळ चालत नाही.त्यामुळे देशात कितीही पक्षांनी एकत्रित येवून आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही. देशातील जनतेच्या मनात पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यात निर्धार कायम असल्याचा विश्वास महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महा जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात सात्रळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधून योजनाची माहीती दिली.खा.डॉ सुजय विखे पाटील जिल्हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले विश्वासराव कडू यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करून, राजकारणात टिका केली जाते परंतू टिका करण्याची पातळी उध्दव ठाकरे यांनी सोडली. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले हा महाराष्ट्राला कलंकच होता असा थेट आरोप त्यांनी केला.आघाड्यांचे राजकारण फार काळ चालत नाही हे राज्याने अनुभवले आहे.देशातही तसा प्रयत्न होत असला तरी त्याला यश येणार नाही.विरोधकांच्या वज्रमूठीला केव्हाच तडे गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.केवळ व्यक्तीद्वेषापोटी मोदीजींवर टिका करण्याचे काम सुरु आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करतात परंतू त्यांना निवडणूकीत जनाधार मिळत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचे संख्याबळही या पक्षाकडे आता राहीलेले नाही. परंतू या विरोधकांना जनतेच्या मनात कोणतेही स्थान नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ९ वर्षात केलेली कामगिरी ही संपूर्ण जगासमोर आहे. आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत देशाकडे पाहीले जात आहे. कोव्हीड संकटातही आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून या देशातील जनतेला केंद्र सरकारने आधार दिला. आज समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली होत आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मार्ग मोदी यांनी सर्वांना दाखवून दिला. योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने केंद्र सरकारची पारदर्शकता जनतेसमोर आली आहे. ९ वर्षात भ्रष्ट्राचाराचा एकही आरोप केंद्र सरकारवर होवू शकला नाही. हाच अभिमान देशवासियांना असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनच्या सरकारला आता उपमुख्यमंत्री अजीत पवारांच्या माध्यमातून तिसरेही इंजिन जोडले गेल्याने हे सरकार आता वेगान पुढे जात असून, गतीमानतेने निर्णयांची अंमलबजावणी होत आहे.शासन आपल्या दारी या उपक्रमातून लाखो नागरीकांना मिळत असलेला न्याय ही राज्य सरकारची खरी उपलब्धी आहे. आता प्रशासनातील आधिका-यांना लोकांमध्ये जावून योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याकडे लक्ष वेधून, मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या माध्यमातून नव्या धोरणांची अंमलबजावणी होत आहे.याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले यांनी शासन आपल्या दारी उपक्रम संपर्ण जिल्ह्यात आयोजित केले जाणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यत पोहचविण्यसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रांताधिकारी सावंत यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आपल्या भाषणात दिला.अनेक युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे सर्वानी स्वागत केले.