चितांबर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवला लोकशाहीचा धडा.

Ahmednagar Breaking News
0

शालेय वयातच विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधींची निवड आणि निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व समजण्यासाठी स्वयंशासन मंडळाची निवडणूक.- सौ.विभावरी रोकडे.

अहमदनगर, प्रतिनिधी. (14. जुलै.) : येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग. ज. चितांबर विद्यालयात स्वयंशासन मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.शालेय स्वयंशासन मंडळाच्या निवडणुकीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना दरवर्षी लोकशाहीची ओळख करून देण्यात येते.राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर शाळेतदेखील निवडणूक आयोग अस्तित्वात असून त्यामार्फत दरवर्षी विद्यालयात सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येते. निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे, उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेणे, दोन दिवसांचा निवडणूक प्रचार, छापील मतपत्रिकांवरील मतदान, मतमोजणी, विजयी उमेदवारांचा शपथविधी आणि पदग्रहण समारंभ अशा विविध टप्प्यांच्या माध्यमातून स्वयंशासन मंडळाच्या प्रतिनिधींची निवड करण्यात येते. निवडून आलेला विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि संस्कार- संस्कृती- समृद्धा अन् भारती या चार गटांचे गटप्रमुख वर्षभर विद्यालयातील विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतात.निवडणुकीसाठी प्रचार करताना इच्छुक उमेदवार आपली अभ्यासातील गुणवत्ता, कलाकौशल्ये, मिळालेली विविध स्पर्धांची पारितोषिके, नृत्य, गायन आणि प्रभावी भाषणांच्या माध्यमातून विद्यार्थी मतदारांना प्रभावित करतात. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय वयातच विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधींची निवड आणि निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व  लक्षात येते.

लोकशाहीचे शिक्षण देणाऱ्या या अभूतपूर्व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.विभावरी रोकडे, पर्यवेक्षिका मंदा शिंदे, निवडणूक अधिकारी सचिन कोटमे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अरुण इघे, वैभव सांगळे, विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच बी.एड. छात्रशिक्षिकांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top