मंत्री विखे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक.

Ahmednagar Breaking News
0

दुधाला हमी भाव 34 रुपये एवढा दिल्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक.

पारनेर,प्रतिनिधी. (15. जुलै.) : महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाचा दर हा कमीत कमी 34 रुपये लिटर केल्याने पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या फोटोला चक्क दुग्धाभिषेक केला.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे जलसंधारण समिती सदस्य राहुल शिंदे पाटील व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते संतोष सरोदे यांच्या नेतृत्वाखाली रांजणगाव मशीद येथील शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांच्या  हिताचा निर्णय घेतल्या बद्दल ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक घालून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी राहुल शिंदे पाटील म्हणाले की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. सर्वसामान्यांना यामुळे न्याय मिळत आहे. शेतकरी हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करत असतो. आपल्या राज्यात दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत हे लक्षात घेऊन मंत्री  विखे यांनी शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळावा या करिता दुधाला आता कमीत कमी ३४ रुपये दर निश्चित केला आहे, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान निर्माण झाले आहे, त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वागत होत आहे.यावेळी रांजणगाव मशीद गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, तसेच  दूध उत्पादक शेतकरी बाप्पुसाहेब जवक, अनिल जवक, बाळासाहेब जवक, सुखदेव सरोदे, माणिक काळे, कैलास शिंदे, हनुमंत जवक, चांगदेव जवक, दत्तात्रय मगर, शिवदास मेहत्रे, दादा लोणकर, सोमनाथ सरोदे, आनंद शिंदे, वसंत जवक, मधुकर जवक, रमेश सरोदे, विलास जवक, शंकर जवक, सचिन शिंदे, सतिश शिंदे, प्रताप शिंदे, धिरज शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, दिगंबर लोणकर, अशोक शिंदे, दत्तात्रय जवक, संदीप जवक व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top