सुंदर अक्षरांतून परिपुर्ण विद्यार्थ्याची ओळख होते. - सौ.धनश्रीताई विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

सुंदर अक्षरांतून परिपुर्ण विद्यार्थ्याची ओळख होते. - सौ.धनश्रीताई विखे पाटील.

 


लोणी,प्रतिनिधि.(17. जुलै.) : संस्कारक्षम शिक्षणासोबत विविध उपक्रमातून प्रवरा शैक्षणिक संकुल हा विद्यार्थी घडवित असतो. सुंदर अक्षर असेल तर त्यातून विद्यार्थी हा गुणसंपन्न असल्याची ओळख होते. यासाठी हॅण्ड राईटिंग एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम ही कार्यशाळा महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन रणरानिगी महीला बचल गटाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवर ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कुल लोणी आणि ग्रॅफो कौन्सिल ऑफ इंडीया अँण्ड पॉवर ऑफ हॅण्ड राइटिंग यांच्या वतीने आयोजिन हॅण्ड राईटिंग एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम कार्यशाळेत सौ. धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रा.प्रतिभ पाटील, प्रा. राजेश कुरकुटे, रुपाली सगर, अश्वीनी काशिद, सुरेखा उगले स्कुलचे विद्यार्थी उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनात सौ धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्याचा सर्वागिंण विकास हाच प्रयत्न प्रवरेचा आहे. आज सुंदर हस्ताक्षर ही काळाची गरज आहे. अक्षरांवरून मुलांची ओळख ठरत असते. आपले आचार-विचार आणि संस्कार यांची ओळख अक्षरांतून होत असते. मुलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम शिक्षक, पालक, आणि शाळा करत असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून पुढे जावे असे त्यांनी आवाहन केले.यावेळी पॉवर ऑफ हॅण्ड राईटिंग गॅफो ट्रेनर, जी सी आई मेनटोरच्या प्रा.प्रतिभा पाटील कार्यशाळेची माहीती देऊन या एक महीन्यात परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम होईल असे सांगितले. यावेळी  राजेश जोहरी देखिल कार्यक्रमात ऑनलाईन  सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top