शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून राज्य सरकारने मोठा दिलासा दिला.- खा.डॉ. सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून राज्य सरकारने मोठा दिलासा दिला.- खा.डॉ. सुजय विखे पाटील.

राहाता,प्रतिनिधी.(18. जुलै.) : शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.या महत्वकांक्षी योजनेत सर्व शेतकरी  सहभागी व्हावेत म्हणून कृषी विभागाने बांधापर्यत जावून योजनेचा प्रसार करावा असे आवाहन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.राहाता तालुका कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन माहीती पुस्तिकेचे प्रकाशन खा.डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी बोलताना खा.डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की,खरीप हंगाम सुरू झाले आहे.पावसा अभावी पेरण्या खोळांबल्या आहेत. निसर्गात कधी असमतोल तयार होईल याची शाश्वती राहीलेली नाही.अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना संरक्षण कवच देण्यासाठी सुरू केलेली एक रुपयात पीक विमा योजना महत्वपूर्ण असून या योजनेचा लाभ शेतकऱ्याचा सहभाग वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी केली.त्याचा सकारात्मक परीणाम आज पाहायला मिळत आहे.किसान सन्मान योजनेपासून ते खतांना अनुदान देण्याबाबतचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असून खतांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारच्या निर्ण्याची मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याने तरूण शेतकरी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून कृषी क्षेत्रात करीत नवे प्रयोग करीत आहेत. यशस्वी प्रयोगामुळे कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप विकसित होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.सोयाबीन पीकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे कौतुक करून यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब भोरे,सहाय्यक किरण धुमाळ राजेश पर्हे योगेश डाके नितीन शिंदे यांनी या पुस्तिकेसाठी पुढाकार घेतला आहे.पुस्तिकेच्या माध्यमातून बीजप्रक्रीया पेरणी एकात्मिक खत व्यवस्थापन किड रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top