खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे समाधान.
अहमदनगर,प्रतिनिधी. (29.जुलै.) : अहमदनगर येथील आशीर्वाद बंगला येथे अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सकाळी साडे आठ सुरू केलेला जनता दरबार हा शेवटच्या नागरिकाचे म्हणणे ऐकण्या पर्यंत सुरू होता. जवळपास दहा तास चाललेल्या या जनता दरबारात नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपापल्या समस्या घेवून आले होते.
खा.विखे पाटील यांच्याकडे नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला नागरिक खासदारांची भेट झाल्यावर चेहऱ्यावर समाधान घेवून बाहेर पडला.यात प्रामुख्याने वैयक्तिक समस्या बरोबरच काही ग्रामीण भागातील शिष्टमंडळ हे देखील गावाच्या समस्या घेवून जनता दरबारात उपस्थित होते. या सर्वांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याच्या दृष्टीने सबंधित अधिकारी, यंत्रणा एवढेच नाही तर मंत्र्यांशी बोलून समस्यांचे निराकरण त्यांनी केले. आजच्या या जनता दरबारात अनेक महिला भगिनींचा मोठा सहभाग हा उल्लेखनीय होता. महिला भगिनींनी वैयक्तिक तसेच कौटुंबिक समस्या यावेळी खा.सुजय विखे यांना सांगितल्या, त्यावर कुटुंबातील मोठ्या बंधू प्रमाणे विखे यांनी त्यांच्या अडचणीची सोडवणूक केली. दरम्यान राज्य शासनाने नुकत्याच पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीची निवड केली त्यात अहमदनगर जिल्ह्यातील दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके आणि महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी विजयसिंह होलम यांचा समावेश आहे. त्या निमित्ताने या पत्रकारांचा सत्कार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी यावेळी केला.तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संदीप कुलकर्णी यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.