समाजकारण,राजकारणात जनतेशी नाळ जोडलेली असली की जनता डोक्यावर घेतेच.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
कर्जत,प्रतिनिधी.(23 जुलै.) : समाजकारणात,राजकारणात तुमची नाळ जनतेशी जोडली की जनता तुम्हाला डोक्यावर घेते, अविरत जनतेशी तुम्ही संपर्कात असाल तर तुमच्यावर जनतेचे कायम प्रेम राहते आणि त्याची पावती कुठल्यानकुठे रुपात तुम्हाला मिळते असे गौरवोद्गार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी काढले. ते कर्जत येथे अंबादास (बप्पाजी)शंकरराव पिसाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आ. प्रा.राम शिंदे,राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की बापाजी पिसाळ यांनी मागील तीस पस्तीस वर्षापासून जनतेची सेवा केली आहे. ही सेवा करताना त्यांनी विविध पक्षातील नेत्यांकडे वेळोवेळी धावा देखील केला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सोबत या भागातील जनतेच्या विकास करिता सहकारात त्यांनी काम सुरू केले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी या भागात सेवा सहकार सोसायटीचे जाळे निर्माण केले आहे. सतत जनतेचा विचार करणारे बाप्पाजी यांनी बदलत्या राजकारणात देखील विखे पाटील कुटुंबा सोबत आपली निष्ठा कायम ठेवली हे विशेष, सध्या कोण कुठे हे सांगणे अत्यंत कठीण जात असताना कधीही वाढदिवस साजरा न करणारे बप्पाजी यांना आपणच आग्रह करून ह अभिष्टिंतन सोहळा आयोजित करण्यास सांगितले , त्यामुळे आपल्या सोबत कोणकोण हे लक्षात येते. मात्र एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यावर कोणाच्या ही मनात कुठलीही शंका राहिली नसेल असे सांगून ते म्हणाले की तुमची जनतेशी नाळ घट्ट आहे. त्यामुळे मला माझा लोकसभेच्या निवडणुकी साठी कुठलीही शंका राहिली नाही. लोकसभा निवडणुकी नंतर आता सेवानिवृत्ती घ्यावी असे त्यांना सांगताना कुटुंबासाठी आता जास्तीतजास्त वेळ द्यावा असे आवाहन केले.आजवर विविध निवडणुका मध्ये आपण किंगमेकरची भूमिका घेतली होती ती तशीच कायम ठेवा , बदलत्या राजकारणात आपण पाहिलं आहे की किंगमेकर जेव्हा किंग होतो तेव्हा त्याची सगळे मिळून कशी वाट लावतात त्यामुळे आपण आपली भूमिका अशीच ठेवावी असे ठाकरे कुटुंबीयांचे उदाहरण देवून त्यांनी सांगितले. या सोहळ्यात प्रा.राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, राजेंद्र फाळके यांची समयोचीत भाषणे झाली.या अभिष्टचिंतन सोहळ्यात तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पिसाळ यांच्यावर प्रेम करणारे शुभचिंतक हे सहभागी झाले होते.सोहळ्यात बप्पाजी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.