नगर जिल्ह्याला ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर.- नामदार राधाकृष्ण विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कृषि यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणी करीता नगर जिल्ह्याला ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर.- नामदार राधाकृष्ण विखे पाटील.

लोणी,प्रतिनिधी. (15. जुलै.) : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला प्राधान्य दिले जात असल्यानेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कृषि यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणी करीता नगर जिल्ह्याला ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.लोणी खुर्द येथेही येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी आणि भाजपाच्या महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधून शासनाच्या योजनांची माहीती दिली.माजी सभापती बापुसाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील शांतीनाथ आहेर नंदूशेठ राठी  संजय जोशी दादासाहेब घोगरे लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड उपसरपंच गणेश विखे,प्रवरा बॅंकेचे संचालक सुधीर आहेर प्रांताधिकारी माणिक आहेर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी नागरीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,या देशातील कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता करून दिली.कृषी क्षेत्रातील वाढत्या यांत्रिकरणाचा विचार करून विविध योजनांतून शेतकर्यांना  सहाय्यभूत ठरतील आशा योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना अर्थिक मदतीची योजना सुरू केली.

खतांच्या किंमती मध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सातत्त्याने अनुदानाची उपलब्धता करून दिलयाने देशात खतांचे भाव स्थिर राहीले आणि टंचाई निर्माण झाली नसल्याकडे  मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.यापुर्वी विमा कंपन्याकडून झालेली फसवणूक लक्षात घेवून राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेत नगर जिल्ह्यातील १लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.मागेल त्याला शेततळे शेडनेट आणि अस्तरीकरण करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी अतिवृष्टी मध्ये नूकसान झालेल्या राहाता तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांना २१ कोटी ७७लाख रुपये, सततच्या पावसाने नूकसान झालेल्या ६हजार शेतकऱ्यांना ९कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने दिली आहे.व्यक्तिगत लाभार्थी योजनेत राहाता तालुका अव्वल असून वेगवेगळ्या सामाजिक योजनापोटी १२ हजार १५४ लाभार्थीना दर महीन्याला १कोटी २१लाख रुपयांचे अनुदान खात्यात वर्ग होत असल्याचे त्यांनी सांगितले.कोण काय टिका करतो याकडे लक्ष न देता आपण काम करीत राहाण्याला प्राधान्य देत असून टिका करणार्यांचे योगदान काय असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला.याप्रसंगी शांतीनाथ आहेर प्रांताधिकारी माणिक आहेर यांची भाषण झाली.शासन आपल्या दारी या उपक्रमातून विखे पाटील यांनी नागरीकांचे प्रश्न समजावून घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top