अहमदनगर -मनमाड,करमाळा व बाह्यवळण महामार्गाचे काम जलद गतीने करा खा.विखे यांच्या सूचना.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर -मनमाड,करमाळा व बाह्यवळण महामार्गाचे काम जलद गतीने करा खा.विखे यांच्या सूचना.

अहमदनगर (प्रतिनिधी. (03. जुलै.) : अहमदनगर मनमाड, नगर बाह्यवळण रस्ता, आणि अहमदनगर - करमाळा ह्या महामार्गांचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजितआढावा बैठकीत ते बोलत होते.

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून या तिन्ही मार्गावर वाहतुकीस अडथळा होऊ नये या करिता महामार्गाचे काम एका बाजूने युद्ध पातळीवर सुरू ठेवून दुसऱ्या बाजूने वाहतूक देखील सुरू ठेवावी अशा सूचना दिल्या, या भागात दुर्दैवाने कुठली दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेवून काम सुरू ठेवावीत. आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी मदत कार्य करणारी क्रेन या सह इतर आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवावी असे सांगितले.  याशिवाय या महामार्गाच्या कामासाठी कृषी,बांधकाम, भूजल सर्वेक्षण, महावितरण या विविध विभागाशी संबंधित असणारे विषय हे तात्काळ मार्गी लावावे असे सांगून ज्या ज्या विभागाच्या ना हरकत तसेच इतर परवानगीसाठी कुठलीही दिरंगाई करू नये अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्तावर कुठल्याही प्रकारचे मोठमोठे खड्डे पडणार नाहीत याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,  विशेष भूसंपादन अधिकारी बालाजी क्षीरसागर, भूमिअभलेख अधिकारी इंदोलकर, मिसाळ कृषी अधिक्षक. सुधाकर बोराळे, नगर तालुका प्रांतधिकारी सुधीर पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दिग्विजय पाटणकर, झोंडगे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top