पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी परीक्षेत यश.
अहमदनगर,प्रतिनिधी. (27. जुलै.) : डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विश्वजित कोहकडे यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेत नगर रचनाकार अधिकारी (वर्ग-१) या पदावर निवड झाली आहे.
विश्वजित कोहकडे यांनी इयत्ता आठवी पासून बारावी पर्यंतच्या शिक्षण हे निवासी विद्यालयात पूर्ण केले.त्यानंतर बी. ई .सिव्हिल इंजिनियरिंग व एम. ई.सिव्हिल इंजिनियरिंग हे त्यांनी डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहमदनगर येथे पूर्ण केले आहे.दरम्यान त्यांच्या या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे कर्मचारी, प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ.उर्मिला कवडे,डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल प्रा.सुनील कल्हापुरे प्राचार्य उदय नाईक यांना दिले आहेत.विश्वजित कोहकडे यांचे संस्थेच्या वतीने महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी तसेच संस्थेच्या संचालक मंडळ, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.