राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपअभियंता तारडे यांना निवेदन.

Ahmednagar Breaking News
0

कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील नेप्ती नाका ते बायपासपर्यंतचे खड्डे तातडीने बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

नगर, प्रतिनिधी.(11. जुलै.) : कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात असून नेप्ती नाका चौक ते बायपास पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग नसून ग्राम पंचायतसारखा रस्ता असल्याचे वाटत आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे, या खड्ड्यामुळे कल्याण रोडवरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करवा लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे सतत अपघात होत असतात. तसेच या भागातून शाळकरी विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून या खड्डेमय रस्त्यातून वाट काढत प्रवास करत आहे, तसेच सिना नदी पुलावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते, तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असून या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे महामार्ग सुस्थितीत नसल्यामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या महामार्गावर मंगल कार्यालये, हॉस्पिटल, पेट्रोल पंप तसेच अमरधाम असल्यामुळे या महामार्गावर वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर असते. त्याचप्रमाणे या महामार्गावर असलेली साईड पट्टी सुध्दा अस्तित्वात दिसून येत नाही. त्यामुळे साईड पट्टीवर मुरूम टाकून ती योग्य स्थितीत करण्यात यावी. जेणेकरुन पादचारी व दुचाकी वाहनांना त्याचा वापर कराता येईल. व महामार्गावर येऊन त्यांचे अपघात होणार नाहीत. तसेच नेप्ती चौक ते सक्कर चौक या महामार्गावर साईड पट्टीवर मातीचे मोठे ढिग असल्यामुळे त्या साईड पट्टीचा वापर करता येत नाही. त्यामुळे साईड पट्टीवरील मातीचे ढिग तातडीने उचलण्यात यावे. तरी नगर कल्याण रोडवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत व नागरिकांसाठी महामार्ग सुस्थितीत यावा. अन्यथा तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी उपअभियंता तारडे यांना निवेदनातून दिला. 

यावेळी प्रा. अरविंद शिंदे, वैभव वाघ, संतोष लांडे, डॉ. योगेश चिपाडे, संजय काका शेळके, हरिभाऊ येलदंडी, अनिकेत चव्हाण, राम वाघ, रोहन शिरसाठ, गणेश कुलथे, अनमोल वाडेकर, भूषण गारुडकर, सनी शिंदे, शुभम भंडारी, आशिष चौधरी, विजय फडतरे, अभी बोडखे, हृषीकेश वाडेकर, संतोष भिंगारदिवे, सागर वहाडणे, जुबेर शेख, दिनेश वाघ, अभी भिंगारदिवे, अंकुश बुरा आदी उपस्थित होते.उपअभियंता तारडे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळासोबत नेप्ती नाका, सिना नदी वरील खड्ड्यांची पाहणी केली असून येत्या ८ दिवसात हे खड्डे बुजवण्याचे काम केले जाईल, तसेच सिनानदी वरील पुलाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ठेकेदार नेमला जाईल व या कामाला सुरुवात केली जाईल असे ते म्हणाले.  


गेल्या अनेक वर्षाचा सिना नदीवरील पुलाचा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे त्याचे काम तातडीने सुरु करावे, हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने पावसाच्या पुरात 10 – 15 तास बंद ठेवावा लागतो, तसेच कल्याण रोड परिसरातील नागरिकांचा यामुळे संपर्क तुटतो त्यामुळे हे काम तातडीने सुरु करावे,

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top