श्री.दत्त देवस्थान वेदांत नगर,प्रेमदान चौक,येथील मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मांदियाळी.

Ahmednagar Breaking News
0

प.पू.श्रीक्षीरसागर महाराजांच्या स्मृती मंदिरात गुरूपौर्णिमेस भाविकांची मांदियाळी.



नगर, प्रतिनिधी. (05. जुलै.) : नगर येथील तपोवन रोडवरील प.पू.श्रीक्षीरसागर महाराजांच्या स्मृती मंदिरात गुरूपौर्णिमेस भाविकांची मांदियाळी.विविध भागातून आलेल्या गुरू-भगिनींनी गुरूदेवांचे दर्शन घेत श्रीदत्तक्षेत्रमधील अधिष्ठान मंडपात पाद्यपूजा करून कृतज्ञता व्यक्त केली. 

पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत स्मृतीमंदिरात लघुविष्णु अभिषेक करण्यात आला. दत्तक्षेत्रमध्ये सकाळी ७ वाजता भगवान श्रीदत्तात्रेय मंदिराचे गाभारामध्ये व्यासपूजा करण्यात आली. सकाळी १० वाजता वेदांत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पाठशाळेतील अध्यापकांचे गुरूपूजन केले.दुपारी १२ वाजता महाआरती होवून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत गुरूदेवांच्या अधिष्ठानमध्ये सत्संग मंडळांच्या पाद्यपूजेचा सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top