नागरिकांना सामाजिक संदेश देण्यासाठी आणि समाज जागृत करण्यासाठी "श्रद्धा सबुरी"या शॉर्ट फिल्मचे खासदार विखेंच्या हस्ते लॉन्चिंग.

Ahmednagar Breaking News
0

श्री.साई द्वारका सेवा ट्रस्टचा उपक्रम लोकांना सामाजिक संदेश देण्यासाठी आणि समाज जागृतीसाठी एक नवीन संकल्पना.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

नगर, प्रतिनिधी. (29. जुलै.) : श्री.साई द्वारका सेवा ट्रस्ट ने एक नवीन संकल्पना आणली असून भक्ती आणि शक्ती याचा मिलाप करून एक वेगळा सामाजिक संदेश लोकांना देण्यासाठी आणि समाज जागृती करण्यासाठी “श्रद्धा सबुरी” च्या माध्यमातून छोट्या छोट्या दोन मिनिटांच्या शॉर्ट फिल्म तयार करून त्या सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवणार असून या क्लिप मधून समाजाला एक वेगळा संदेश भेटणार आहे.सदर शॉर्ट फिल्म चे लाँचिंग शनिवारी अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी साईद्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव, दिग्दर्शक अनंत जोशी, मितेश शहा, राहुल मुथा, विराज मुनोत, सारंग देशपांडे, प्रशांत जठार, महादेव गाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top