शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतला हा निर्णय.

Ahmednagar Breaking News
0

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे शिक्षण आयुक्त पुणे विभाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण.

नाशिक,प्रतिनिधी.(11.ऑगस्ट.2023.) : नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 पासून शिक्षण आयुक्त पुणे विभाग,पुणे यांच्या कार्यालयासमोर कोकण विभागाचे माजी आमदार बाळाराम पाटील,पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत,व अमरावती विभागाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने राज्यातील सर्व स्तरावरील शालार्थ आयडी प्रकरण निकाली काढण्याबाबत व वाढीव पदांची माहिती कनिष्ठ महाविद्यालय शासनाला तात्काळ पाठवणे बाबत व अहमदनगर जिल्ह्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करण्यात यावे व शासन स्तरावर तसे आदेश निर्गमित करण्यात यावे व 20% 40% 60% शिक्षकांचे पगार वेळेत करण्यात यावे, तसेच बी.एल.ओ. च्या कामातून मुख्याध्यापक व महिला शिक्षकांना वगळावे या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक विभागाच्या शिक्षक आमदार किशोर  दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व आमदार उपोषणास बसणार आहे.तरी या आंदोलनास शिक्षक बंधू  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सर्व आमदारांच्या वतीने करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top