सैन्य दलाचा दारुगोळा व शस्त्र बाळगल्याचे गंभीर आरोपातून आरोपीस जामीन मंजूर.
नगर,प्रतिनिधी. (22. ऑगस्ट.2023.) : दि.२१/०७/२०२३ रोजी एम.आय.डी.सी. पो.स्टे.अहमदनगरचे पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, इसम नामे दिनकर शेळके याने सैन दलाचा दारुगोळा व शस्त्र बाळगले आहेत. सदर गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून छापा टाकला असता इसम दिनकर शेळके याचे ताब्यात (१)१८ टँक राऊंड १२ जीवंत व ६ मृत,.(२) ५५ मि.मि. च्या ५ मोटर राऊंड.(३) ८ दारुगोळा पिस्टल राऊंड.(४) १६ पिस्टल राऊंड.(५) २५ कि.ग्रॅ. टीएनटी पावडर.(६) लाल व पिवळी वायर बंडल केबल इत्यादी दारुगोळा व शस्त्र पोलीसांना दिनकर शेळके याचे ताब्यात मिळून आले व पोलीसांनी त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले.आरोपीचे वतीने अॅड. अक्षय दांगट व अॅड. निलेश देशमुख यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे समोर जामीन अर्ज मांडला व न्यायालयास निदर्शनास आणुन दिले की,आरोपी याचा भंगारचा व्यवसाय असून वरील सर्व जप्त केलेला मुद्देमाल हा त्याचेकडे गावातील काही लोकांनी विक्री केलेला होता त्याचेशी आरोपीचा काहीही संबंध नाही. त्यावर सरकारी वकीलांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून आरोपीस जामीन देऊ नये अशी बाजू मांडली.दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा.जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी आरोपी दिनेश शेळके यास जामीन मंजूर केला.आरोपीतर्फे अॅड. अक्षय दांगट व अॅड. निलेश देशमुख यांनी काम पाहिले.