तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी सौरभ बोरा यांची दुसऱ्यांदा नियुक्ती.

Ahmednagar Breaking News
0

तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी सौरभ बोरा यांची दुसऱ्यांदा नियुक्ती.

नगर, प्रतिनिधी.(26.ऑगस्ट.2023.) : आंध्रप्रदेश येथील तिरूमला तिरूपती देवस्थानच्या संचालक मंडळावर प्रसिद्ध उद्योजक सौरभ बोरा यांची नियुक्ती करण्यात आलीय. आंध्रप्रदेशचे राज्यपाल अब्दुल नजीर यांच्या आदेशावरून संचालक मंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा सौरभ बोरा यांची संचालक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भारतातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून तिरूपती बालाजी देवस्थान ट्रस्टची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं मोठ्या संख्येनं भाविक तिरूपती बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. केवळ भारतातीलच नव्हे तर जगात सर्वात मोठी धार्मिक विश्वस्त संस्था अशी या देवस्थानची ओळख आहे. या विश्वस्त संस्थेच्या सदस्य पदी सौरभ बोरा यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रस्टवर एकूण २८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश चॅरिटेबल एंड हिंदू रिलिजिएस इंस्टिट्युशन्स एंड एंडोवनमेंट्स एक्ट १९८७ नुसार आंध्रप्रदेश सरकारने या नियुक्त्या केल्या आहेत. तिरूपती विधानसभा मतदारसंघाचे आमदार भुमाना करूणाकर रेड्डी यांची याआधीच ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रस्टच्या नव्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील सौरभ बोरा, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे.सौरभ बोरा हे कॉर्पोरेट जगातील प्रसिद्ध आणि विश्वासार्ह नाव आहे. अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्यांनी कंपन्यांना सक्षमपणे उभे केले आहे. याशिवाय ते ISKCON (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिएसनेस) JITO (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन), JATF (जैन एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाऊंडेशन) या धार्मिक-सामाजिक संस्थांसोबतही काम करत आहेत. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. JATF या संस्थेचे विश्वस्तही आहेत. शिवाय JITO या संस्थेचे मुख्य संस्थापक, मार्गदर्शकही आहेत. मुंबईतील जुहू इथल्या प्रसिद्ध इस्कॉन मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. नवी दिल्ली इथल्या श्री. वेंकटेश्वरा कॉलेजचे संचालकही आहेत.अहमदनगर इथल्या जैन कम्युनिटी हॉस्पीटल आणि अनाथ मुलांसाठी असलेल्या पंपकीन हाऊस या अनाथालयासाठी सौरभ बोरा नियमितपणे मोठ्या प्रमाणावर देणगी देत असतात. सौरभ बोरा यांचे वडील दिवंगत हेमराज बोरा हे अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे संस्थापक-अध्यक्ष होते. तर आई श्रीमती प्रमिला बोरा या देखील बँकेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक आहेत. याशिवाय त्या द अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या संचालकही आहेत. सौरभ बोरा यांच्या पत्नी डॉ. राखी या शेअर मार्केटच्या व्यवसायात सक्रीय आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top