कर्जतचे ग्रामदैवत श्री.संत सदगुरु गोदड महाराज यांच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी....

Ahmednagar Breaking News
0

कर्जतचे ग्रामदैवत श्री.संत सदगुरु गोदड महाराज यांच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी....

कर्जत,प्रतिनिधी.(25.ऑगस्ट.2023.) : कर्जत शहराचे ग्रामदैवत असलेले श्री.संत सदगुरु गोदड महाराज यांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यावेळी पै.प्रवीण घुले,मा. जिल्हा परिषद सदस्य,कर्जत तालुका अध्यक्ष तालीम संघ यांनी ABN शी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी महेश तनपुरे,दादासाहेब रोकडे,संभाजी पाटील,पिंटू शेलार,विजय मोरे,नावेद पठाण,सुरेश काका खिस्ती,तानाजी पाटील,अशोक भगत,अमोल भगत,अमोल कदम,विश्वजीत काकडे,शिवम कांबळे,प्रणित पाटील,सुजित घोरपडे,कार्तिक पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.गोदड महाराज जन्मस्थळ, ध्यानमंदिर,पाटील गल्ली येथे शनिवार दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:00 ते 11:00 यावेळेत ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित केले असून दुपारी 12:05.मि.सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.तरी भाविकांनी जन्मोत्सवाचे दिवशी घरासमोर सडा,रांगोळी, तोरण व गुढी उभारून महाराजांचे जन्माचे उस्फूर्तपणे स्वागत करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दुपारी 12:35 पासून भाविकांच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा फायदा घ्यावा.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top