सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून तमाम नगरवासीयांना केले आवाहन....

Ahmednagar Breaking News
0

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून तमाम नगरवासीयांना केले आवाहन....

नगर,प्रतिनिधी.(29.ऑगस्ट.2023.) : रक्षाबंधन ह्या सणाचे महत्व आपणा सर्वांना असे माहित आहे की प्रत्येक भावाने आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करणे.सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या स्वतःच्या परिवारात  सुखा-दुःखात ज्यावेळेस आपली चार भावांची एकच लहान बहीण असून तिने कशाप्रकारे परिवारातील सदस्यांना मदत केली याबाबतचा लेख आज ABN शी बातचीत करून ABN मध्ये " ताई तुसी ग्रेट हो "हा प्रकाशित करण्यात आला.दिवसभरात नगरकरांनी हा लेख वाचून त्याचे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. ज्याप्रमाणे आपण आपल्या बहिणीचे कायम रक्षा करण्याची शपथ घेतो, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपल्यासमोर जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर त्या स्त्रीला देखील मदत करण्याचे आवाहन यावेळी श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top