पन्नास हजार महिला भगिनींच्या पंढरपूर तीर्थ यात्रेचं पुण्य‌‌ घडले.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

भक्तिपीठ ते शक्तीपीठ तीर्थयात्रेत पन्नास हजार महिलांचे दर्शन.

समाजकारणा बरोबरच वारकरी संप्रदायाचा वारसा कायम जपला.-माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील.

पंढरपूर,प्रतिनिधी.(28.ऑगस्ट.2023.) : भक्तीपीठ ते शक्तीपीठ अशी पन्नास हजार महिला भगिनींची तीर्थ यात्रा काढण्यांचे पुण्य विखे पाटील परिवारास मिळाले हे आमचे भाग्य आहे, ह्या पुण्याच्या शिदोरीवरच जन कल्याणाचे आपण काम करू असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.पंढरपूर येथे ते बोलत होते. भक्तिपीठ ते शक्तीपीठ या तीर्थ यात्रेच्या समारोप पंढरपूर येथे झाला.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, इस्कॉन मठाचे श्रीकृष्ण चैत्यन्य महाराज स्वामी, श्री प्रल्हाद प्रभुजी,अच्युत प्रभुजी,माजी नगरसेविका पुष्पाताई शेळके, तुळजापूरचे नगरसेवक विशाल रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार महिलांना अधिकमास आणि श्रावण मासा निमित्त तीर्थ यात्रा घडवावी. या संकल्पनेनुसारच भक्तीपीठ ते शक्तीपीठ असा तीर्थ यात्रेचा मार्ग ठरवून पंढरपूर ,तुळजापूर अशी तीर्थ यात्रा या महिला भगिनीना मागील चाळीस दिवसा पासून सुरू आहे. या चाळीस दिवसात दररोज २३ ट्रॅव्हल्स मधून या महिला भगिनींना दर्शनाची सोय करण्यात आली होती. प्रवासा दरम्यान कुठलीही अडचण येणार नाही या करिता संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. एवढंच नाही तर मुक्कामाच्या ठिकाणी प्रशस्त व्यवस्था , चांगले जेवण यासह वैद्यकीय सुविधा देखील ठेवण्यात आली होती. या तीर्थ यात्रेचे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते हे सांगताना दोन महिन्यापासून यावर काम सुरू होते असे सांगितले. चाळीस दिवसात पन्नास हजार माता भगिनीचे पंढरपूर , तुळजापूर असे छान दर्शन झाले. दर्शन करून परत आल्यावर या माताभगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हा कशातच मोजता येणारा नाही असे सांगून या तीर्थ यात्रेचे विखे पाटील परिवारास एवढं पुण्य मिळाले असून हे संचित पुण्य जन कल्याणासाठी आम्हाला उपयोगी पडेल अशी मला खात्री असल्याच्या त्यांनी सांगितले. या तीर्थ यात्रेच्या यशस्वीतेनंतर विखे पाटील परिवाराच्या वतीने डिसेंबर २०२४ मध्ये माता वैष्णवी देवीच्या दर्शनाचे नियोजन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.भक्तीपीठ ते शक्तीपीठ या तीर्थ यात्रेसाठी इस्कॉन मठाचे प्रभू चैतन्य स्वामी महाराज,ह.भ. प. धावणे महाराज, माजी नगरसेविका सौ.पुष्पाताई शेळके , तुळजापूरचे नगरसेवक विशाल रोचकरी,उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, मंदिर ट्रस्ट,नगरपालिका प्रशासन,आरोग्य  विभाग,यांच्यासह प्रवरानगर उद्योग समुहाचे अधिकारी- कर्मचारी , महिला पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांचे मनापासून आभार खा. विखे यांनी आपल्या भाषणतून व्यक्त केले.यावेळी जि.पच्या. मा. अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलतांना सांगितले की विखे पाटील परिवार  हा राजकारण फार कमी आणि समाजकारण हे कायम करत आले आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेत असताना या तीर्थ यात्रेच्या निमित्ताने पन्नास हजार माताभगिनींना पंढरपूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवले हे याचच एक उदाहरण आहे. मतदार संघ म्हणजे आमचा परिवार आहे. या परिवाराच्या सुखदुःखात आम्ही कायम सहभागी असतोत. या महिलांनी या तीर्थ यात्रेसाठी येवून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करून खा.डॉ.सुजय विखे यांनी अत्यंत छान   केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे यावेळी त्यांनी कौतुक केले. या सांगता समारोप प्रसंगी तीर्थ यात्रा यशस्वितेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला तर इस्कॉन मठ,जिल्हा प्रशासनाच्या वतीने खा.विखे व सौ.शालिनीताई विखे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास इस्कॉन मठाचे शिष्य, मंदिर ट्रस्टचे कर्मचारी, भाविक महिला, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top